गोंदिया: गोंदिया शहर परिसरामध्ये बनावट विडी तयार करण्यचा आणि विक्री करण्याचा व्यवसाय फोफावत आहे. गोंदियातील रामनगर पोलिसांनी मंगळवार, १७ जून रोजी बनावट विडी बनवणाऱ्या कारखान्यावर आणि त्याच्या गोदामावर छापा टाकला.
शहरातील पूना टोली, लोकमान्य टिळक वॉर्ड येथील कारखान्यातून बनावट विडीची हजारो पाकिटे आणि गोल बिडी, मंगलोर देसाई बिडी, मनोहर बिडी, मंगलोर गणेश बिडी, भारत बिडी, कोंब्रा ब्रँड बिडी, सबडे बिडी, मुर्गा ब्रँड बिडी, ५०२ नंबर बिडी, बादशाही बिडी इत्यादींचे वेस्टन आणि इतर कच्चा माल आणि यंत्रसामग्री तसेच लाखो किमतीच्या माल जप्त केला
वेष्टन वेगळेच.. आत वस्तू वेगळीच…
गोंदिया शहरात बनावट बिडी निर्मितीच्या कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली असता गोल बिडी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजरच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी छापा टाकला.
गोंदिया मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट (डुप्लिकेट) बिड्या तयार केल्या जातात.या बनावट बिड्या बनवणारे कारखाना मालक सरकारला कर ही देत नाहीत. छत्तीसगडच्या धमतरी येथे बनवलेल्या प्रसिद्ध ब्रँडेड गोल विडी कंपनीच्या पॅकेटचे दर प्रति बंडल १७० रुपये आहे, परंतु गोंदिया सह जवळच्या शहरी बाजारपेठांमध्ये, मूळ बिड्यांसारख्याच बनवलेल्या बनावट बिड्या १३५ ते १४० रुपयांना विकल्या जात आहेत, ज्यामुळे मूळ गोल विडीची विक्री कमी झाली आहे त्यानंतर शहरातील पुनाटोली येथील कारखान्याच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला व ३.५ लाख रुपयांचा माल जप्त केला.
बनावट विडीचा कारखाना चालविणारे आरोपी माणिकलाल बोडलू पानतवणे (५६ राहणार पुनाटोली) आकाश माणिकलाल पानतवणे (२९,पुनाटोली) देवेंद्र टिळकचंद गजभिये (३६) मोहगाव, तहसील, गोरेगाव यांच्या विरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.