गोंदिया : गोंदिया शहरातील मुख्य बाजारात लोकांची नेहमी वर्दळ असलेल्या अशा गजबजलेल्या गोरेलाल चौक ठिकाणी दुकानाच्या पहिल्या माळावर इमारतीच्या भिंतींचे निर्माण कार्य सुरू होते. दरम्यान निर्माण कार्य सुरू असलेल्या दुकानाची भिंत अचानक येथे काम करत असलेल्या मजुराच्या अंगावर कोसळली असल्यामुळे या भिंतीच्या ढिगार् यात दबून येथे काम करत असलेल्या दोन मजुरा पैकी एकाच्या मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज बुधवारी गोंदियातील मुख्य बाजारपेठ गोरेलाल चौक येथे दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. अक्षय कुमार पाचे रा. बिरसी ता. गोंदिया असे या घटनेतील मृत मजुराचे तर जितेंद्र बाहे रा. डांगोर्ली ता. गोंदिया असे या घटनेतील गंभीर जखमी मजुराचे नाव आहे.
जखमी मजुराला तातडीने गोंदिया येथील केटीएस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार गोंदियातील मुख्य बाजारपेठेत अनिल कुमार जैन आणि अंजली स्टोअर्स यांच्या मालकीच्या असलेल्या कापड दुकानाच्या पहिल्या माळ्यावर भिंतीचे बांधकाम गेल्या एका आठवड्यापासून सुरू होते.आज नेहमीप्रमाणे या बांधकाम कामावरील मजूर यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.पण दुपारी १२:३० च्या सुमारास ही निर्माणधीन भिंत अचानक कोसळली त्यामुळे या भिंतीच्या ठिकाणी दबून एक मजुराच्या मृत्यू तर एक गंभीर जखमी झालेला आहे.
गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या अनिल कुमार जैन यांच्या दुकानाचे पहिल्या माळ्याचे बांधकाम सुरू होते आज बुधवारी भिंत अचानक येथे काम करत असलेल्या मजुराच्या अंगावर कोसळली त्यात एकच मजुराचा मृत्यू तर एक गंभीर घायल झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर प्रकरण दाखल केले. भिंत कशामुळे कोसळली या घटनेच्या तपास कार्य सुरू आहे. मजुराचा मृत्यू बांधकाम ठिकाणी झाला असल्यामुळे मृतक मजुराच्या कुटुंबीय आणि जखमी असलेल्या मजुराच्या कुटुंबीयांनी सदर बांधकाम सुरू असलेल्या दुकान मालक अनिल कुमार जैन यांच्याकडे मोबदल्याची मागणी केली आहे.किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे, गोंदिया