गोंदिया : पहाटेच्या सुमारास मित्रमंडळी सोबत नदीवर आंघोळी करिता गेलेल्या तीन तरुणां पैकी दोघांच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवार २५ मे रोजी सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास आमगाव तालुक्यातील कालीमाटी जवळ पोकेटोला- मानेकसा येथील बाघनदी च्या मानेडोहात घडली.
कृष्णाकुमार हेतराम पारधी (१९) आणि शुभम भीमराव कांबळे (२०) दोघे रा. कालीमाटी ता. आमगाव असे या घटनेतील मृतक तरुणांचे नाव आहे. तर रवी नानू टेंभरे (१७) हा सुदैवाने बचावला आहे. या घटनेतील मृतक कृष्णकुमार पारधी हा इंदिरा गांधी हायस्कूल कालीमाटी येथे शिक्षण घेत होता. त्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा ८५% गुण मिळवून उत्तीर्ण केली होती. तर शुभम कांबळे हा स्वामी विवेकानंद महाविद्यालय कालीमाटी येथे बी.ए.प्रथम वर्षची परीक्षा देत होता.
मानेकसा येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी अगदी पहाटेच्या सुमारास कालीमाटी येथील तीन तरुण दौड लावत पोकेटोला- मानेकसा येथील बाघनदी च्या तिरावर पोहचले. आंघोळी करिता नदीत उतरले, ते अधिक खोल असलेल्या मानेडोहात गेले तेथे बुडत असताना त्यांनी आरडा ओरड सुरू केला असता तिसऱ्याने. या बाबतची माहिती आपल्या मोबाईलवरून कालीमाटी गावात दिली. कालीमाटी आणि मानेकसाच्या मच्छीमार बांधवांनी आणि स्थानिक शोध बचाव पथकामार्फत कृष्णाकुमार आणि शुभमचे मृतदेह नदीतून बाहेर काढले.
मे महिन्यात आजपर्यंत एकूण ५ बुडाले….
गोंदिया जिल्ह्यात मे महिन्यात घडलेल्या अशा प्रकारच्या घटना एकूण ५ जणांच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. यात शुक्रवार २ मे २०२५ रोजी सालेकसा तालुक्यातील तिरखेडी येथे आंघोळी करिता गेलेल्या प्रशांत बिसेन (१८) आणि प्रतीक बिसेन (१८) या दोन तरुणांचा धरणात बुडूनमृत्यू झाला होता. तर रविवार १८ मे २०२५ रोजी गोंदिया जवळील खमारी येथील फुटका तलाव येथे बैल धुण्याकरिता गेलेल्या विश्व योगराज प्रधान (१६) या मुलाचा तलावातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. आज रविवार २५ मे रोजी आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील बाघ नदीत बुडून कृष्णकुमार पारधी आणि शुभम कांबळे यांच्या मृत्यू झालेला आहे.