काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात एक विधान केलं होतं. संभाजी ब्रिगेडने आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. आता आरक्षण-आरक्षण बस झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही, तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते.

आज मराठा म्हटलं की वेगळवेगळ्या चर्चा करण्यात येतात. काही लोक वेगळ्या दृष्टीने चर्चा करतात. मराठा म्हणताना मराठी माणूस लढाऊ माणूस असं चित्र होतं. मराठा समाजाचे वैशिष्ट्ये हे आहे की, समाजाची उन्नती कशी होईल?, असा विचार मराठा समाज करत असतो, असेही शरद पवारांनी सांगितलं होतं.

हेही वाचा : “हा ठराव निलंबनाचा नसून अविश्वासाचा आहे, त्यासाठी..”, राहुल नार्वेकरांविरोधातील ठरावाबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितला नियम!

शरद पवारांच्या या आरक्षणाबद्दलच्या विधानावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यावर टीका केली आहे. “खरेतर सगळ्या लोकांनी यांना निटपणे ओळखलं आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांची पिळवणूक सुरु आहे, ती सुरु राहिली पाहिजे, असं त्यांना वाटतं. पण, आम्हाला राजकीय सत्तेत वाटा मिळाला नाही, शैक्षणिक दृष्टा मागस आहोत, नोकरीत टक्का नाही आहे. तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पाट्या उपेक्षित लोकांच्या दिसतात का? ही तफावत कमी होण्यासाठी आम्हाला आरक्षण मिळालं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : संजय राऊतांनी अनिल देशमुखांची घेतली भेट; नवाब मलिकांचा उल्लेख करत म्हणाले, “ज्यापद्धतीने आमच्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवारांना कोणत्या दृष्टीतून आरक्षण नको आहे, हे राज्याला सांगितलं पाहिजे. पण, हे आरक्षणाच्या विरोधात आहेत, हा संदेश राज्यात गेला. त्यांचा खरा चेहरा या विधानानंतर समोर आला आहे. मताचे राजकारण करताना शरद पवार पुढे असतात. शालिनी पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली, तेव्हा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. लोक शरद पवारांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहत नाहीत,” असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला आहे.