चंद्रपूर : भारत सरकारने २०० नवीन विमानांचे ऑर्डर दिली आहे. त्यामुळे भविष्यात ८ ते १० हजार वैमानिकांची गरज पडणार आहे. त्यासाठी आतापासूनच प्रशिक्षित वैमानिक घडविणे आवश्यक असले तरी प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठी लागणारे विमान तुलनेने कमी असल्याने येत्या काळात प्रशिक्षण विमांनाची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अ‍ॅरो फ्लाँईंग क्लबचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री खासदार राजीव प्रताप रूडी यांनी दिली.

चंद्रपूर येथील मोरवा येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी ते आज चंद्रपूरला आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते.

खा.राजीव प्रताप रूडी म्हणाले की, नागपूर येथे असलेल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्रातील दोन विमाने परत घेऊन जाणार होतो मात्र चंद्रपूर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ती दोन प्रशिक्षण विमाने चंद्रपूरसाठी दिले आहेत मात्र चंद्रपूरसाठी आणखी प्रशिक्षण विमानांची गरज आहे असेही ते म्हणाले. भविष्यात चंद्रपूरचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र भारतातील प्रमूख प्रशिक्षण केंद्रापैकी एक असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वसाधारण परिवारातील युवक, युवतींना पायलट बननण्याची ईच्छा असते मात्र यासाठी लागणार्‍या अवाढव्य खर्चामुळे ते बनू शकत नाहीत मात्र आता देशातच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही संधी मिळू शकते असेही ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या व्यावसायीक विमानतळाबाबत बोलतांना ते म्हणाले की, चंद्रपूरला विमानतळ आवश्यक आहे, प्रस्तावित विमानतळाचे कार्य जरी थांबले असले तरी या विमानतळासाठी काय करता येईल ते करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.