नागपूर : मुस्लीम समाजाचे सामाजिक, साहित्यिक, नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. साहित्य, कला, संगीत क्षेत्रातील मुस्लिमांच्या सहभागाने भारतीय संस्कृती समृद्ध केली. मात्र, त्यांच्या याेगदानाची योग्यप्रकारे दखल घेण्यात आली नाही. काेणत्याही समाजाची प्रगती साहित्य, नाट्य, संगीत, सांस्कृतिक विकासावर अवलंबून असते. याकडे आपल्याच समाजाने दुर्लक्ष केल्याने आज मुस्लीम समाजाला उपेक्षिले जाते, अशी खंत पहिल्या राज्यस्तरीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा फरझाना म. इकबाल डांगे यांनी व्यक्त केली.

भारतीय मुस्लीम परिषद, डाॅ. मेघनाद साह सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच व छवी पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयाेजन टिळक पत्रकार भवन येथे करण्यात आले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक डाॅ. अनुपमा उजगरे, श्रावण देवरे, प्रा. डाॅ. युसूफ बेन्नूर, प्रा. रमेश पिसे, डाॅ. रफीक शेख, बाबाखान पठाण, हाजी नासिर खान, डाॅ. असलम बारी, प्रा. शकिल अहमद, शकील पटेल, ताहीरा शेख, डाॅ. ममता मून प्रामुख्याने उपस्थित हाेते.

lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

हेही वाचा – “पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार?” नितेश राणेंचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

फरझाना म्हणाल्या, मुस्लिमांबाबत नेहमी एकच बाजू बिंबवली गेली. सत्य बाजू समोर आणण्याचे काम साहित्यिकांचे आहे. मुस्लीम समाजसुद्धा शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही. त्यामुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये मुस्लीम युवकांचा टक्का कमी आहे. साहित्यात १८ पगड जातींच्या समस्या लिहिल्या जात नाहीत. त्यामुळे समाज उपेक्षित राहिला आहे. महाराष्ट्रात हजारावर मुस्लीम मराठी साहित्यिक आहेत. दर्जेदार गझल, कविता, नाट्य, कथासंग्रह, ललित लेखन करणारे आहेत. मात्र, या क्षेत्रातच त्यांची ओळख दुर्लक्षित केली जाते. भारतात गंगा-जमुना संस्कृती हाेती आणि हिंदू-मुस्लीम एकत्रित नांदत हाेते. मात्र, ही ओळख पुसून विष पसरवले आणि मुस्लीम समाजाप्रती द्वेष पसरवला जात आहे. याला उत्तर देण्यासाठी इतिहासाची पाळेमुळे खणून काढावी लागतील, सत्य मांडावे लागेल, असे फरझाना इकबाल यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले. आयाेजन समितीचे प्रा. जावेद पाशा यांनी संचालन केले. राेशनी गणवीर यांनी आभार मानले.

हेही वाचा – “महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवा,” असदुद्दीन ओवेसी यांचे आवाहन; म्हणाले, “धर्मातून नेतृत्व निर्माण झाले तरच…”

आमच्याकडे नेहमी संशयाने का पाहता – अनुपमा उजगरे

ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजात खूप समानता आहे. देशसेवेत दोन्ही समाज कणभरही कमी नाहीत. आम्ही सहिष्णू आहोत आणि लगेच विरोध करीत नाही. आमच्या समाजाची प्रतिमा चित्रपट, नाट्यात चुकीची रंगवली आहे. त्यामुळे आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी वाईट असतो. कुणावर दहशतीचे हात उगारून हे हाेणार नाही. त्यासाठी लेखणीचे शस्त्र हाती घ्यावे लागेल. द्वेषाची भिंत पाडावी लागेल, अशी भावना उद्घाटक डाॅ. अनुपमा उजगरे यांनी व्यक्त केली.