नागपूर : सोने गुप्तांगामध्ये लपवून मुंबईहून नागपूराला येत असलेल्या एका तस्कराला सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपूर विमानतळावर अटक केली. साधारणत: आंतरराष्ट्रीय विमानाने नागपुरात तस्कर येत असतात. परंतु, देशांतर्गत विमानाने पहिल्यांदाच सोन्याची तस्करी आढळून आली आहे.

मुंबईहून नागपूरला येत असलेल्या ‘गो फर्स्ट जी ८-२६०१’ क्रमांकाच्या विमानाने येणाऱ्या तस्कराकडून एक किलो २३६ ग्रॅम सोने जप्त केले. त्याची किंमत सुमारे ७९ लाख रुपये आहे. अब्दुल रकीब असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी गुप्तांगामध्ये ‘पेस्ट स्वरूपात’ सोन्याची पिवळी पेस्ट लपवून ठेवली. रकीब हा देशांतर्गत प्रवास ‘गो फर्स्ट जी ८-२६०१’ क्रमांकाच्या विमानाने मुंबईहून नागपूरला येत होता.

हेही वाचा >>> “पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर सावधान…”, काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या बदलांचे नाना पटोलेंचे संकेत

सकाळी ८.२० वाजता विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती. तो मूळचा कर्नाटकचा असून मुंबई येथे मिरारोडवर राहत आहे. त्याला मुंबई विमानतळाच्या स्वच्छतागृहात एका विदेशी मूळच्या व्यक्तीने हे सोने दिले. नागपुरातील एका पेट्रोल पंपजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तीला देण्यास सांगितले होते.

हेही वाचा >>> “काँग्रेसकडे एकनाथ शिंदेंपेक्षा ताकदीचे नेते, फक्त…”, नाना पटोलेंचा खोचक टोला

५ कोटी रुपये सरकारला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कस्टम खात्याने नागपूर विमानतळावरून गेल्या महिन्यापर्यंत तस्करीद्वारे जप्त केलेले १० किलो सोने आरबीआय विकले. त्यातून ५ कोटी रुपये मिळाले आहे. ही रक्कम सरकारकडे जमा करण्यात आली, असे सीमा शुल्क आयुक्त अभयकुमार यांनी सांगितले.