चंद्रपूर: ऐन पावसाळ्यात १५ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने चंद्रपूर शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. तापमानाने ३५ ते ४० अंशाचा पारा गाठला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना कुलर व वातानुकूलित यंत्रणेचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळा कि, उन्हाळा असा प्रश्न पडला आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धानपिके करपण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा >>>किनगाव राजाचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात, अटक टाळण्यासाठी मागितली लाच; गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून चंद्रपूरला ओळखले जाते. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाने दीर्घ काळ उघडीप दिल्याने चंद्रपूर शहरात चक्क उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. तापमान ३५ ते ४० डिग्रीच्या घरात गेले आहे. शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसा कडक उन्ह व चिडचिडी गरमीने नागरिक हैराण झाले आहे. पावसाळा लागताच बंद करून ठेवलेले कुलर नव्याने लावाले लागत आहे. नागरिकांना रात्री कुलर व वातानुकूलित यंत्राचा वापर अत्यावश्यक झाल्याचे विचित्र चित्र आहे. मागील १५ दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने कापूस सोयाबीन व धान पिके पाण्याविना करपण्याच्या मार्गावर आहेत.