scorecardresearch

धक्कादायक! पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने मेहुणीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

भोंदूबाबाने नवरा बायकोला पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काही मंत्र दिले. पत्नीच्या बहिणीशी तीन महिने शारीरिक संबंध ठेवल्यास पैशाचा पाऊस पडतो, असा सल्ला दिला होता.

धक्कादायक! पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने मेहुणीवर सहा महिन्यांपासून बलात्कार
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून बायकोच्या बहिणीवर सहा महिने बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

पत्नीच्या बहिणीसोबत तीन महिने शारीरिक संबंध ठेवल्यास पैशाचा पाऊस पडतो, अशी अंधश्रद्धा बाळगून एका महिलेने आपल्या लहान बहिणीला पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. हा बलात्कार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता. अखेर मुलीने ही बाब आईला सांगितल्यानंतर बिंंग फुटले. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हे दाखल केले.

हेही वाचा- ‘खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठीच जुनी पेन्शन योजना बंद’; ॲड. आंबेडकर यांचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक दाम्पत्य राहते. त्यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. लग्नाच्या काही दिवसानंतर ते एका भोंदू बाबाकडे गेले. त्या भोंदूबाबाने त्यांना पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काही मंत्र दिले. पत्नीच्या बहिणीशी तीन महिने शारीरिक संबंध ठेवल्यास पैशाचा पाऊस पडतो, असा सल्ला दिला. पत्नीनेही पतीला होकार देत १५ वर्षांच्या मेहुणीलाही शारीरिक संबंधासाठी तयार केले. तिलाही पैशाचा पाऊस पडल्यावर पैसे देण्याचे आमिष दाखवले.

हेही वाचा- ‘नागपूर शहरातील मैदानाच्या विकासासाठी शंभर कोटी देणार’; फडणवीस यांची घोषणा

गेल्या आठ महिन्यांपासून तो मेहुणीवर बलात्कार करीत होता. परंतु, अनेक दिवसांपासून पैशाचा पाऊस पडत नसल्यामुळे दाम्पत्य नाराज होते. जानेवारी महिन्यापासून मेहुणी शारीरिक संबंधासाठी नकार देत होती. त्यामुळे तिची बहीण आणि पतीसुद्धा तिला मारहाण करू लागले. तो तिच्याशी बहिणीच्या उपस्थितीत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागला. तिची प्रकृती बिघडल्यामुळे ती नातेवाईकाकडे गेली. तिने तेथे आईला बोलावून घेतले आणि सर्व हकीकत सांगितली. तिच्या आईने थेट नरखेड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी दाम्पत्याला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 12:29 IST

संबंधित बातम्या