नागपूर : बंगालच्या उपसागरावर बाष्पयुक्त वारे जमा झाल्यामुळे बुधवारपर्यंत पाऊस पाठ सोडण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत देशातील विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तमिळनाडूच्या किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान दक्षिण कर्नाटक, लक्षद्वीप या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारत व लगतच्या भगात पावसाची शक्यता आहे. मंगळवार नऊ जानेवारीला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – नागपूर : छायाचित्रकाराला मारहाण करून पोलिसांनी उकळले ६० हजार?

हेही वाचा – वर्धा : व्याजाच्या पैशांमधून केला जाहिरातीचा खर्च, म्हणून संस्थेचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकण, गोवा, पूर्व मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम राजस्थान या भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात प्रदेशचा किनारी भाग तसेच छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतदेखील पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.