विदर्भात सलग तीन दिवस ठाण मांडलेल्या पावसाने मंगळवारपासून उसंत घेतली आहे. पूरस्थिती ओसरली असून पुरामुळे बंद झालेले अनेक रस्ते मोकळे झाले आहेत. दरम्यान शनिवारपर्यंत उघाड आणि २१ ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सातत्याने विदर्भात पूरस्थिती निर्माण केली आहे. अधूनमधून पाऊस उघडीप देत असला तरी विदर्भातील नदीनाले दुथडीभरून वाहत आहेत. त्यामुळे पाऊस कोसळला की लगेच पूर येऊन मार्ग बंद होत आहेत. गेल्या तीन दिवसांच्या पावसाने गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोंदिया जिल्ह्यातील मार्ग सुरू झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील काही मार्ग देखील मोकळे होत आहेत. मंगळवारी अनेक जिल्ह्यात सूर्यनारायणाने डोके वर काढल्याने सततच्या पावसमूळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.