अकोला : मूकबधिर विद्यार्थ्यांना आता ‘हायटेक’ शिक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच अकोल्यातील शासकीय मूकबधिर विद्यालयात हा प्रयोग केला जाणार असून बहुभाषिक ‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून विद्यार्थी धडे गिरवणार आहेत.

मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. पहिली ते सातवीच्या मूकबधिर विद्यार्थ्यांना विविध विषय ‘डिजिटल’ माध्यमातून शिकण्यासाठी ‘सॉफ्टवेअर’ व ‘टॅब’ सुविधांचा प्रारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते येथील शासकीय मूकबधिर विद्यालयात करण्यात आला. त्यामुळे ही शाळा आता महाराष्ट्रातील पहिली ‘डिजिटल’ साहित्य समावेशक शासकीय मूकबधिर विद्यालय ठरले आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, कौशल्य विकास सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, समाजकल्याण अधिकारी पी.डी. सुसतकर, ‘लर्न ॲण्ड एम्पॉवर प्रा. लि.’चे सीओओ प्रबोध महाजन, नॅशनल फेलो ऋग्वेद ऐनापुरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापक अलका मोडक आदी उपस्थित होते.

हेही वाचा – नागपुरात ३१ फुटांचे ‘श्री राम’..  हलबा समाज शिल्पकार संघद्वारे अयोध्येतील मंदिर सोहळ्यादरम्यान नियोजन

टॅबचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. हे कर्णबधिरांसाठी भारतातील पहिले बहुभाषिक सॉफ्टवेअर आहे. ते भारतीय सांकेतिक भाषेत शिक्षण, इंटरनेटवरील माहिती व अध्ययनाला सहायक आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येणार आहे. ‘लर्न ॲण्ड एम्पॉवर’ने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या संशोधनाला रोजगार व उद्योजकता विकास विभागाच्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत पारितोषिक मिळाले आहे.

हेही वाचा – वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे युवा दिनी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण? वादाची ठिणगी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॉफ्टवेअरच्या साह्याने स्वत:च शिकणार

‘रेझोनेट लर्निंग’ व ‘साईनअसिस्टिव्ह प्लॅटफॉर्म’ ॲप मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणात उपयुक्त ठरू शकतात. गणित व इंग्रजी हे विषय सॉफ्टवेअरद्वारे ऑफलाईन शिकणेही शक्य आहे. यामुळे मुले सॉफ्टवेअरच्या साह्याने स्वत:च शिकू शकतील, अशी माहिती महाजन यांनी दिली.