लोकसत्ता टीम

वर्धा: सहकारी पक्षांची मोट बांधत सहकार नेते सुधीर कोठारी यांनी हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समितीत सत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. रात्री उशिरा निकाल जाहीर झाले.

हिंगणघाट येथे आमदार रणजीत कांबळे यांचे चार, आमदार समीर कुणावर यांचे दोन, एक शेतकरी संघटना तर उर्वरित अकरा उमेदवार कोठारी गटाचे निवडून आले आहेत. कोठारी यांनी या सर्व गटांना स्वतःच्या नेतृत्वात एकत्र आणले होते. डॉ. निर्मेश कोठारी यांची अध्यक्षपदी निवड निश्चित समजल्या जाते. समुद्रपूर बाजार समितीत तीन उमेदवार अविरोध निवडून आल्याने पंधरा जागांवर निवडणूक झाली. या सर्व जागा कोठारी नेतृत्वातील शेतकरी पॅनलने जिंकल्या. इथेही आघाडी होती. यात चार आमदार कुणवार गटाच्या, दोन शेतकरी संघटनेच्या व उर्वरित कोठारी गटाच्या आहेत.

आणखी वाचा-आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर; केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधात असणाऱ्या माजी आमदार राजू तिमांडे, भाजप व काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तीन गट आहेत. तिघांच्याही वेगवेगळ्या भूमिका होत्या. मात्र उर्वरित दोन गटांना कोठारी यांनी बाजार समितीत चंचू प्रवेशही करू दिला नाही. राज्यातील बलाढय व सर्वपक्षीय नेत्यांनी गौरवलेली उपक्रमशील बाजार समिती म्हणून हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे.