scorecardresearch

वर्धा: नागरिकांनो, शोभायात्रेत सहभागी होताना घ्या काळजी, रहा सतर्क

श्रीराम प्रभूंच्या जयजयकारात निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी होत असाल तर खबरदारी घेणे आवश्यक आहे.चोरांनी डाव साधला तर जबाबदार कोण,असा प्रश्न होता.

wardha
नागरिकांनो, शोभायात्रेत सहभागी होताना घ्या काळजी, रहा सतर्क

श्रीराम प्रभूंच्या जयजयकारात निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी होत असाल तर खबरदारी घेणे आवश्यक आहे.चोरांनी डाव साधला तर जबाबदार कोण,असा प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर शोभायात्रा समितीने इशारा देणारे पत्रकच काढले. दुपारी बारा वाजता जन्मोत्सव व सायंकाळी सहा वाजता निघणाऱ्या यात्रेत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. लोक राममय झाले असतात.

हेही वाचा >>>यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर

मात्र, गर्दीत हात साफ करणारेही असतात. बेसावध लोकं त्यास बळी पडतात. सोनसाखळी, मंगळसूत्र गायब करतात. हे होवू नये म्हणून बेंटेक्स व अन्य स्वरूपातील आभूषणे घालून येण्याची सूचना केल्याचे समिती सदस्य कमल कुलधरिया यांनी केली आहे.संस्कृती दर्शक कपडे घालावे. ठिकठिकाणी लंगरचा आस्वाद घेतल्यानंतर कागदी पेले, वाट्या कचरा डब्यातच टाकावे.अन्नाची नासाडी टाळावी, अशा व अन्य सूचना करण्यात आल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या