लोकसत्ता टीम

वर्धा: कर्नाटक विधानसभेत मिळालेले लक्षणीय यश काँग्रेस नेत्यांचा आनंद द्विगुणित करणारे ठरत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या व टोकाचा राजकीय विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांसाठी ही संजीवनीच ठरल्याचे दिसून येत आहे.

आर्वी येथे बाजारात लागलेला भव्य फलक त्याची साक्ष ठरावा. पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रचारात ठासून सांगितलेले वक्तव्य या फलकावर आहे. मात्र त्यात, ‘नफरतखोर चीत, भाईचारे की हुई जित’ असे काव्य साधून हाणलेला टोला लक्षवेधी ठरू लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… “राजकारण करणं पीएचं काम व्हय का?” आमदार केचेंची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘पीएं’वर टीका; ऑडियोने खळबळ

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर म्हणतात की, बाजार समिती निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर कर्नाटकचे यश कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे आहे. आपण जिंकू शकतो ही भावना मरगळलेल्या स्थितीत वावरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चेतना देत आहे. लहान-लहान गावातील काँग्रेसी सक्रिय झाले आहेत.