“राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मलाही राजकारणाची आवड आहे. त्यात मूळचा महाराष्ट्रातील असल्यामुळे येथील राजकीय घडमोडींची आवड अधिक आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर बहूमत चाचणीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकत होतो. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांना सारखे काही गोष्टी सांगत होते, तर काही गोष्टी बोलण्यापासून रोखत असल्याचे पाहिले.”, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या सूनवणीकडे राज्यातील सगळ्या राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे. केंद्रातील भाजप सरकारही याकडे लक्ष ठेऊन आहे. मात्र, यावेळी न्या. भूषण गवई ११ जुलैपासून सर्वोच्च न्यायालयाला सुट्ट्या लागत असल्याचे उपरोधिकपणे म्हणाले.
नागपूरचे माजी पालकमंमत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधी विद्यापीठाच्या उभारणीत मोठी मदत केली. नागपूरचा पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कोण आहे माहिती नाही, मात्र ते नागपूर जिल्ह्याला एक दमदार नेता देतील असा विश्वास देखील न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2022 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये मलाही आवड – न्यायमूर्ती भूषण गवई
फडणवीस नागपूर जिल्ह्याला एक दमदार नेता देतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-07-2022 at 18:03 IST
TOPICSदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनागपूर न्यूजNagpur Newsमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politics
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am also interested in the political developments in maharashtra justice bhushan gavai msr