कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच विविध भागात मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.  २४ ते २७ जून या काळात राज्यात कमी वेळेत मूसळधार पाऊस होईल, असेही खात्याने म्हटले आहे.

हेही वाचा >>> महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पाऊस; काय आहे हवामान खात्याचा अंदाज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २३ जूनला मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच कोकण भागात पावसाला सुरुवात होईल. २४ जूनला पावसाचा जोर वाढेल. तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचे आगमन होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, जूनचा उत्तरार्ध येऊनही राज्यातील अनेक भागात मान्सून न पोहचला नसल्याने शेतकऱी चिंतित  होते.  आता हवामान खात्याने  मान्सूनच्या आगमनाची तसेच तो राज्यात सर्वत्र पसरण्याचे संकेत दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशादायक वातावरण निर्माण होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.