लोकसत्ता टीम

नागपूर : उड्डाण पुलाची चुकीची रचना आणि उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याने उत्तर नागपुरातील नागरिकांना रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ, सिव्हिल लाईन्सकडे ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझनच्या सभासदांनी या समस्येकडे अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावर प्रशासनाने काहीही केले नाही. सदर उड्डाण पूल बांधण्यात आल्याने संविधान चौकातून उत्तर नागपुरात जाण्यासाठी सरळ मार्गाच उरलेला नाही. बिशॉप कॉटन, स्मृती सिमेना टॉकिजकडून वळण घेऊन उत्तर नागपूर गाठावे लागते. शिवाय या भागात वाहतुकीची कायम कोंडी होत असते.

आणखी वाचा-नागपूर : फडणवीस यांची ग्रामस्थांशी ‘चाय पे चर्चा‘, म्हणाले…

एखाद्या उड्डाण पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याचा देशात पहिलाचा प्रयोग नागपुरात झाला आहे. झिरो माईलपासून उत्तर नागपुरात येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रिझर्व बँक ते कामठी रोड हाच एकच मार्ग आहे. मागील पन्नास वर्षांपासून सुरू होता, पण आताच दोन वर्षापासून हा मार्ग बंद आहे. सदर बाजारपेठेतून उड्डाण पूल करण्यात आले. त्यामुळे कोराडी व सावनेर मार्गाने येणाऱ्यांची सोय केली आहे. परंतु उत्तर नागपूरच्या नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे, नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमचे नरेश साखरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर नागपूरच्या विकासाच्या बाबतीत प्रशासन आणि शासन उदासून आहे. उत्तर नागपूरचा मुख्य रस्ता बंद करून उत्तर नागपूरबद्दल उदासीन मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. -अश्विन बोरकर, नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरम.