scorecardresearch

Premium

मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून अथर्वशीर्ष पाठ, मंत्रजप

२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेत येण्यासाठी अकोला भाजपच्यावतीने गणपती अथर्वशीर्ष व ‘गण गणात बोते, श्री गजानन, जय गजानन’ मंत्रजप करण्यात आला.

bjp workers, ganpati atharvashirsha akola, akola narendra modi
मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून अथर्वशीर्ष पाठ, मंत्रजप (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अकोला : २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेत येण्यासाठी अकोला भाजपच्यावतीने गणपती अथर्वशीर्ष व ‘गण गणात बोते, श्री गजानन, जय गजानन’ मंत्रजप करण्यात आला. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी सुखी-समृद्ध राहून भारत महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण होण्यासाठी वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने विशेष प्रार्थना देखील भाजपच्यावतीने करण्यात आली. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, संत गजानन महाराज पुण्यतिथी व गणेशोत्सवानिमित्त गणपती अथर्वशीर्ष, नामजप कार्यक्रम भाजपच्या अकोला कार्यालयात घेण्यात आला.

हेही वाचा : चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; उपोषणकर्ते टोंगेंची प्रकृती खालावली

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही का?
Karyakarta Mahakumbh bhopal Pm Narendra Modi
भाजपाकडून केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणुकीत का उतरविण्यात येत आहे?
sansad
मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती विधेयके येणार? सरकारने जाहीर केली यादी!
youth attempts suicide outside of deputy cm office
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी आणखी एका कायद्याची भर? सुशासन मसुद्यात स्थायी समितीची तरतूद

कार्यक्रमाचे प्रारंभी अनुप धोत्रे यांनी गणेश पूजन केले. पुजेमध्ये २७ जोडपे सहभागी झाले होते. दोन तास विशेष पूजा, मंत्रोच्चार सुरू होते. यावेळी २५१ अथर्वशीर्ष पाठ करण्यात आले. ‘गण गणात बोते’, ‘जय गजानन,श्री गजानन’चा जप करून सप्तऋषींना स्मरण केले. महाआरती विजय अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकले, किशोर पाटील, जयंत मसने यांच्या नेतृत्वात वेगवेगळे कार्यक्रम भाजपच्यावतीने घेण्यात येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In akola bjp workers chants ganpati atharvashirsha for narendra modi government again in 2024 ppd 88 css

First published on: 21-09-2023 at 12:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×