अकोला : अकोला-अकोट रेल्वेमार्ग सुरू होऊन एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. कोट्यवधींच्या खर्चातून निर्मिती करण्यात आलेल्या या मार्गावर वर्षभरापासून केवळ एकाच डेमू गाडीच्या तीन फेऱ्या होत आहेत. या मार्गावर आणखी अतिरिक्त गाड्या सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अकोला रेल्वेस्थानकाहून दक्षिण मध्य रेल्वेचा हैद्राबाद – अजमेर मार्ग जोडला आहे. भारतातील रेल्वे मार्गांचा विकास केला जात आहे. त्या अंतर्गत अकोला – पूर्णा व अकोला – अकोट मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यात आले. वर्षभरापूर्वी २३ नोव्हेंबरला अकोला – अकोट ब्रॉडगेज सुरू करून पहिली डेमू या मार्गावर धावली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने ०७७१८ अकोला-अकोट पॅसेंजरला हिरवी झेंडी दाखवली होती.

हेही वाचा : चंद्रपूर : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

हेही वाचा : यवतमाळ : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकप्रतिनीधी व प्रवाशांनी उत्साहाने या पॅसेंजरचे स्वागत केले होते. ब्रॉडगेज झाल्यानंतर या मार्गाचा विकास होण्याची अपेक्षा फोल ठरली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, रेल्वे प्रवासी संघटनच्या मागण्या असतांना सुद्धा या मार्गावर अपेक्षित विकास झालेला नाही. अकोला – अकोट मार्गावर दिवसात डेमूच्या तीन फेऱ्या होतात. अकोट येथे ‘लोकोरिव्हर्सल’ सुविधा पूर्ण करून अकोलापर्यंत येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा अकोटपर्यंत विस्तार करावा, अकोट रेल्वेस्थानकावर दिवे, प्रसाधनगृह, पाण्याची सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अकोट येथे आरक्षण खिडकी सुरू करावी आदी मागण्या प्रवासी संघटनेने केल्या आहेत.