अकोला : पशुधन विकास मंडळाचे नागपूर येथे पळवलेले मुख्यालय अकोल्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे मुख्यालय पुन्हा अकोल्यात स्थलांतरित करण्याचे निर्देश महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मुख्यालय अकोला शहरात स्थलांतरित करण्यासाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून त्यांच्या मागणीला यश आले आहे.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मुख्यालय अकोल्यात २००२ मध्ये सुरू झाले होते. त्याच्या सहा महिने अगोदर या मंडळाची स्थापना करून मुख्यालय पुणे येथे सुरू करण्यात आले होते. त्यावेळी अकोल्याचे डॉ. दशरथ भांडे पशुसंवर्धन मंत्री होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या जास्त आहेत, या भागातील शेतकऱ्यांना मंडळाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने त्याचे मुख्यालय विदर्भात असावे, अशी भूमिका घेतली. अकोल्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय असल्याने याच ठिकाणी मंडळाचे मुख्यालय स्थापन होण्यासाठी पुढाकार घेतल्यावर मंडळाचे मुख्यालय पुण्यावरून येथे स्थलांतरित झाले. १९ वर्षे हे मुख्यालय अकोल्यात कार्यरत होते. मात्र, कार्यालयाला स्वत:ची इमारत नव्हती. अधिकारी देखील येथे येण्यास टाळाटाळ करीत असल्याने मंडळातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहिली.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…

हेही वाचा : नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनातून काय साध्य झाले ?

मुंबई, पुणे, दिल्ली येथील अधिकाऱ्यांना अकोल्यात येणे गैरसोयीचे वाटत असल्याने प्रशासनाकडून मुख्यालय इतरत्र हलवण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुनील केदार पशुसंवर्धन मंत्री झाल्यावर मुख्यालय स्थलांतरणाचा घाट पुन्हा घालण्यात आला. तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी अधिकार व वजन वापरत ५ फेब्रुवारी २०२१ ला शासन निर्णय निर्गमित करून मंडळाचे मुख्यालय नागपूरला हलविले. ‘मविआ’ सरकारच्या या निर्णयाविरोधात अकोल्यात किरकोळ स्वरूपाचा विरोध झाला.

हेही वाचा : चंद्रपूर : दोन वाघ रस्ता पार करताना दिसल्याने खळबळ, उर्जानगर वसाहत परिसरात सतर्कतेचा इशारा

दरम्यान, हा मुद्दा आमदार सावरकर यांनी लावून धरला. पश्चिम विदर्भातील पशुपालकांची मोठी संख्या लक्षात घेता व त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी पशुधन विकास मंडळ कार्यालयाची नितांत आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली. त्यावर मंत्र्यांनी मुख्यालय अकोल्यात स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! तलाठ्यावर गौण खनिज तस्करांचा जीवघेणा हल्ला

इमारतीसाठी निधी उपलब्ध

शहरात पशुधन विकास मंडळाची सुमारे दोन हेक्टर जागा उपलब्ध आहे. मुख्यालयाची प्रशासकीय इमारत तसेच आयुक्तांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०१९-२० मध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.