अकोला : पती व पत्नीमध्ये प्रेम, विश्वास व जिव्हाळ्याचे नाते असते. हे नाते साताजन्माचे असल्याची भावना भारतीयांच्या मनात आहे. ६० वर्षांच्या संसारात अतूट प्रेम असलेल्या पती व पत्नीने अवघ्या आठ तासाच्या अंतरात जगाचा निरोप घेतल्याचा अतिशय भावनिक व दुःखद प्रसंग जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडला. वयस्कर दाम्पत्यामधील प्रेमामुळे मृत्यू देखील त्यांची ताटातूट करू शकला नाही. अतूट प्रेमाच्या भावनेमुळेच त्यांनी एकत्रितपणे जगातून निरोप घेतल्याची चर्चा मृत्यूनंतर होत आहे.

जिल्ह्यातील बाळापूर शहरात गुजरातीपूरा भागामध्ये रमेशसिंग करणसिंग गौतम (८२) यांचे राहणे होते. दीर्घ आजारामुळे रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले, तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई (७६) यांनी देखील पहाटे अंतिम श्वास घेतला. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ तासातच पत्नीने देखील हे जग सोडले. लग्नानंतर ६० वर्ष वैवाहिक आयुष्याचा प्रवास एकत्र केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग आणि पद्माबाई या दोघांची पहिली भेट त्यांच्या पाहणीच्या कार्यक्रमात झाली होती. त्यावेळी पती २२, तर पत्नी १६ वर्षांच्या होत्या.

Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Aruna Irani reacts on not having baby
“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

हेही वाचा : नागपुरातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात आरोपी महिलेला जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने…

पद्माबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील होते. रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले होते. लग्नानंतर दोघांचाही संसार आनंदाने फुलला. संसाररुपी वेलीवर दोन मुले आणि दोन मुली अशी फुले उमलली. मुलांचे पालपोषण त्यांचे शिक्षण यामध्ये आयुष्याची अनेक वर्ष निघून गेली. कालांतराने मुल-मुली मोठे झाल्यावर त्यांची लग्न झाली. नातवंडांच्या रूपाने जीवनात आणखी आनंद आला. आयुष्यात सुख समाधान होते. संपूर्ण आयुष्य बाळापूरसारख्या लहान शहरात गेले. ६० वर्षांचा दीर्घकाळ एकमेकांसोबत आनंदी संसारात गेला. वयोमानानुसार आरोग्याची कुरबुरी सुरू झाली. दीर्घ आजापणामुळे पतीचे निधन झाले.

हेही वाचा : अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री

पती रमेशसिंग यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नी पद्माबाई यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यातून त्या सावरू शकल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ तासातच पत्नी पद्माबाई यांनी आपला जीव सोडला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दु:खद प्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते. पती व पत्नीमध्ये खूप प्रेम होते, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याची बरीच चर्चा आहे.