अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्‍यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले. अंजनगाव सुर्जी येथील बुधवारा परिसरात राहणाऱ्या गौर यांच्या घरात नवीन सिलिंडर मधून वायू गळती व्हायला लागताच आग लागून सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत भारती शिवा गौर (५०) , गंगाबाई रामलाल गौर (७० ), उमा लखन गौर (५०), निकिता अक्षय गौर (३०), ममता संतोष गौर (३५), हंसिका संतोष गौर (१२), हंसी मनीष गौर(९), आयुष अक्षय गौर (३), पियुष अक्षय गौर (६) असे नऊ जण गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीने अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : ‘त्या’ वाघिणीला पुन्हा ‘रेडिओ कॉलर’ लावून केले निसर्गमुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेत निकिता गौर या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात निकिता गौर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्‍यात आले, त्‍यानंतर त्यांना तत्काळ अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले. गौर कुटुंबातील प्रमुख शिवाचिन्ह गौर आणि घरातील इतर पुरुष मंडळी हे त्यांच्या व्यवसायानिमित्त बाहेर असल्यामुळे बचावले.