अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागात गेल्‍या नोव्‍हेंबर महिन्‍यात एकूण १ लाख ८ हजार प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले गेले आहेत. अनधिकृत प्रवास करणाऱ्या लोकांकडून रेल्‍वेच्‍या भुसावळ वाणिज्‍य विभागाने ९.५६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. रेल्‍वेमधील सोयी-सुविधांबाबत प्रवाशांची ओरड सुरू असतानाच दुसरीकडे, विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्‍वे प्रवाशांच्‍या संख्‍येत वाढ होताना दिसत आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात‎ विनातिकीट प्रवास‎ करणाऱ्यांविरुद्ध रेल्वेच्या वाणिज्य‎ विभागाने धडक मोहीम सुरू केली‎ आहे. नोव्‍हेंबर महिन्‍यात ९.५६ कोटी रूपयांची‎ दंडात्मक वसुली केली.‎ यात प्रामुख्याने गर्दीची रेल्वे‎ स्थानके असलेल्या मनमाड,‎ नाशिक, भुसावळ, खंडवा,‎ अकोला, बडनेरा या स्थानकांवर‎ हे तिकीट परीक्षण‎ करण्यात आले.

Pune Metro, ruby hall, ramwadi Extended Route, Surge in Ridership, Revenue, yerwada metro station, pune citizen in metro, maha metro, marathi news, metro news,
पुणे मेट्रो सुसाट! प्रवासी संख्ये सोबतच उत्पन्नातही मोठी वाढ
Pune Airport , Pune Airport Records , Over 95 Lakh Passengers, 2023 financial year, airoplane passangers, airoplane, pune, pune news, ariport news, marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! विमानतळावरून तब्बल ९५ लाख प्रवाशांचे ‘उड्डाण’
mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड

हेही वाचा : चिंता वाढली! पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; गोंदिया जिल्ह्यात आत्तापर्यंत १२०० हेक्टरवर नुकसान

१३० कोटींचा महसूल

भुसावळ रेल्‍वे विभागाला नोव्‍हेंबर महिन्‍यात १३० कोटी रुपयांचा महसूल प्राप्‍त झाला आहे. यात तिकीट तपासणीतून मिळालेल्‍या ६ कोटी रुपयांचा समावेश आहे. भुसावळ विभागात प्रवासी वाहतुकीतून ६४.९९ कोटी रुपये, माल वाहतुकीतून ५४.२४ कोटी, पार्सल वाहतुकीतून २.०८ कोटी, तिकीट तपासणी मोहिमेत ६.४२ कोटी, पार्किंगमधून ९.१५ लाख, खाद्य विभागातून ९५ लाख रुपये महसूल मिळाला आहे.