अमरावती : यावर्षी सोयाबीनच्या दरात मागील दीड ‎‎महिन्यांपासून सातत्याने घट होत असून ‎‎सध्या बाजारात सोयाबीनचे दर ४ हजार ‎‎४५० रुपयांपर्यंत ‎‎खाली आले. सोयाबीनचे दर वाढतील ‎या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी ‎सोयाबीनची विक्री केली नव्हती, मात्र‎ भाव वाढण्याऐवजी कमी होत आहेत.‎ अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत २० जानेवारी रोजी ६ हजार ७८९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. किमान ४ हजार ४५० तर कमाल ४ हजार ५३६ म्‍हणजे सरासरी ४ हजार ४९३ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. १५ जानेवारीला सोयाबीनला अमरावती बाजार समितीत सरासरी ४ हजार ५५६ रुपये दर मिळाला होता.

या वर्षी सोयाबीनचे उत्पादनही अपेक्षित झालेले नाही. पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही. ऐन फुलोरावस्थेत पीक असताना पावसाने दांडी मारल्यामुळे सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन आले नाही. शिवाय बी-बियाणे, कीटकनाशके, मशागत आणि शेतमजुरीचे वाढलेले दर पाहता सोयाबीनने शेतकऱ्याला फारसे काही हातात लागू दिलेले नाही. एकरी दोन क्विंटलपासून उत्पादन झाले. हंगामात गरजेपुरते सोयाबीन विक्रीला काढून उर्वरित सोयाबीन भविष्यात भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवले. पण सध्या सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारांवर गेलेले नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकरी सोयाबीन विकण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन

व्यापाऱ्यांनी सुद्धा हंगामात सोयाबीन साठा करून ठेवला आहे. खासगी पतसंस्था किंवा बँकांचे कर्ज उचलून वेअर हाउसमध्ये व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवलेले आहे. आज या सोयाबीनमध्ये लाखो रुपये व्यापाऱ्यांनी गुंतवून ठेवले आहेत. बँकांचे व्याज बघता आणि सोयाबीन बाजाराचा कल पाहता व्यापारीसुद्धा द्विधा मनःस्थितीत आहेत.

हेही वाचा : वर्धा : प्रभू रामाने दूर केले राजकीय वैर; केचे-काळे-वानखेडे आले एकत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील एक ते दीड‎ महिन्यापासून कापसाच्या दरातही घसरण सुरू आहे. कापूस निघाला त्यावेळी ‎बाजारात ७ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव‎ होता. समोर भाव वाढतील, अशी‎ शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र‎ वाढण्याऐवजी दर झपाट्याने घसरले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. सध्या कापसाचे दर ६ हजार ६०० ‎ते ६ हजार ७२५ रुपये उत्तम दर्जाच्या‎ कापसाला तर पावसामुळे भिजलेल्या‎ कापसाला तर ६ हजार २०० ते ६ हजार‎ ३०० इतकाच भाव मिळतो आहे. पावसामुळे कपाशीच्या उत्पादनातही ‎घट आली तसेच अनेक भागात‎ बोंडअळीचा प्रकोपही झाला होता,‎ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अवघ्या‎ दोन वेच्यानंतर उलंगवाडी केली आहे.‎ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी यंदा‎ उत्पादनात घट व भाव कमी झाल्यामुळे‎ आर्थिक अडचणीत आले आहेत.