भंडारा: एका ३३ वर्षीय नराधमाने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करून त्यांनी तिला लॉजवर नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यातून समोर आला आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरूणाने अल्पवयीन मुलीला फसवलं. तसेच शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर, लॉजवर नेत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

प्रकाश सुखदेवे (वय वर्ष ३३) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित दोघेही मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत. आरोपीनं आधी पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नंतर विविध ठिकाणी नेत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवला. नंतर आरोपीनं मुलीला भंडारा शहराजवळील जमनी दाभा येथील साई लॉजवर नेलं. तिकडे आरोपीनं पीडितेच्या मनाविरूद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला अल्पवयीन मुलीनं विरोध केला. तरीही त्याने बळजबरी केली. मात्र, त्यानंतर तरूणीनं पळ काढण्याचा प्रयत्न केला.

१४ वर्षीय मुलीनं थेट पोलीस ठाणे गाठले तसेच पोलिसांना आपबिती सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ६५ (१), १३७ (२) पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करीत अटक केली. दरम्यान, लॉज मालकावर देखील सवाल उपस्थितीत करण्यात येत आहे. लॉज मालकानं परवानगी दिलीच कशी? असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत. लॉज मालकावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.