भंडारा : सीतासावंगी परिसरात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अशोक मेश्राम हे आज सकाळी त्यांच्या सहकाऱ्यांसह सीतासावंगी परिसरात गस्त घालत होते. त्यांना बिबट्याचा मृतदेह दिसून आला. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली.

हेही वाचा : सरसंघचालक मोहन भागवत गजानन महाराज चरणी नतमस्तक; कडक सुरक्षेत विविध स्थळांचे दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते, टिळक त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तीव्र विजेच्या धक्क्याने बिबट्याची शिकार करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी या भागात दोन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.