भंडारा : निसर्गाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या पिवळ्या कंठाच्या चिमण्यांची (चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया) शिकार करून विक्रीच्या तयारीत असलेल्या पाच शिकाऱ्यांना पवनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८४ चिमण्या जप्त केल्या असल्या तरी दुर्देवाने त्या सर्व मृतावस्थेत होत्या. या प्रकरणी पाच आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यात गोपीचंद काशीराम शेंडे (अर्जुनी, मानेगाव बाजार, ता. भंडारा), भाऊराव गणपत मेश्राम (ढिवरवाडा, ता. मोहाडी), विलास ताराचंद भुरे (नवेगाव, ता. कुही, जि. नागपूर), सुनील लवाजी शेंडे (अर्जुनी, मानेगाव बाजार), नितीन अभिमन केवट (नवेगाव, ता. कुही) यांचा समावेश आहे. पवनी वनपरिक्षेत्राच्या टेकाडी शेत शिवारालगत अवैध विक्रीच्या उद्देशाने पिवळ्या गळ्याच्या चिमण्यांची शिकार होत आहे.

शिकार केलेल्या चिमण्या घेऊन आरोपी येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून आमगाव बिटचे वनपाल आणि वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून या पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या साहित्याची झडती घेतली असता २८४ चिमण्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्याकडून पक्षी पकडण्यासाठी वापरण्यात आलेली जाळी, दोरी यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. या सर्वांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला. पाचही आरोपींची चौकशी सुरू असून आरोपींना पवनीच्या न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका

हेही वाचा…टिपेश्वर अभयारण्यातील ‘त्या’ वाघाची फासातून सुटका, शिकाऱ्यांनी लावला होता…

यासंबंधी उपवनसंरक्षक राहुल गवई यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या पूर्वीही पवनी वन परिक्षेत्रात पक्षांच्या शिकारीचे प्रकार घडले आहे. या शिकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोतच, मात्र नागरिकांना अशाप्रकारे पक्षांची किंवा प्राण्याची शिकार करताना कुणी आढळत असल्यास त्यांनी वन विभागाच्या १९२६ या क्रमांकावर संपर्क करून याबाबत त्वरित माहिती द्यावी असे आवाहन उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी केले आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षण (रोहयो) व वन्यजीव सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली नागदेवे, वनपरिक्षेत्रा अधिकारी एल. व्ही. ठोकळ, पंकज देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच. जी. भोयर, वनपाल आय. एच. काटेखाये, पी. डी. गिदमारे, एन. एम. हुकरे, एस. आर. भोंगे, संगीता घुगे, एम.एस.मंजलवाड, एम. बी शिंदे यांच्यासह वनमजुरांच्या मदतीने करण्यात आली.