नागपूर : वाघांच्या शिकारी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी शिकाऱ्यांचे प्रयत्न काही थांबत नाहीत. असाच एक सापळा टिपेश्वरच्या जंगलात वाघांसाठी शिकाऱ्यांनी लावला आणि वाघ त्यात अडकला. गळ्याभोवती अडकलेला फास घेऊन तो सुटकेसाठी फिरत होता. अखेर या वाघाला शनिवारी बेशुद्ध करून त्याच्या गळ्याभोवतीचा तारांचा फास काढण्यात वनविभागाला यश आले. अमरावती येथील रॅपिड रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आले होते.

अवघ्या एक वर्षे वयाच्या वाघाला शिकाऱ्यांनी आपले लक्ष केले होते. शुक्रवारी या अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना या वाघाच्या गळ्याभोवती फास अडकून असल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबत टिपेश्वर अभयारण्यातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर वाघाची शिकारीच्या फासातून मुक्तता करण्यासाठी अमरावती येथील रॅपिड रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यातील कक्ष क्रमांक १११ मध्ये हा प्रकार घडला.

Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

हेही वाचा – वर्धा : धक्कादायक! खोटे शिक्के तयार करून कोर्टालाच फसविले

टिपेश्वर अभयारण्यासह प्रादेशिक जंगलात रानडुकर व इतर वन्य प्राण्यांची शिकार करून त्याची अवैधपणे विक्री करण्याचा प्रकार अधूनमधून सुरू असतो. त्यासाठी वनकर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिकारीसाठी सापळे लावले जातात. मात्र, यावेळी त्या सापळ्यात वाघ अडकल्याचे लक्षात आले. ही माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, सहायक वनसंरक्षक रवींद्र कोडलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे, वनपाल, वनरक्षक यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्या वाघाला सापळ्यातून मुक्त करण्यासाठी बेशुद्ध करणे आवश्यक असल्याचे लक्षात येताच, अमरावती येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्या चमूने शनिवारी तीन फेब्रुवारीला सकाळी या वाघाला बेशुद्ध करून त्याच्या गळ्याभोवतीची तार काढून टाकली.

हेही वाचा – बागेत सर्व प्रकारच्या फळे पण, खाणारे असतील फक्त पक्षी; असा असेल नागपूरचा बर्ड पार्क

बछड्याला कोणत्याही प्रकारची जखम किंवा इजा झाली नसल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. या वाघाच्या गळ्याभोवती शिकारीचा फास अभयारण्य क्षेत्रात अडकला की अभयारण्याच्या बाहेर अडकला, हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरीत आहे.