बुलढाणा : शहरात रविवारी भीम जयंती मिरवणुकीदरम्यान एकांतातील जागेत एका युवकाची चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली. यामुळे शांततेत पार पडलेल्या जयंती उत्सवाला गालबोट लागले असून शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या अंधारलेल्या परिसरात १४ एप्रिलला रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

आशुतोष संजय पडघन (२४ ) असे मृताचे नाव आहे. जुना वाद किंवा मिरवणुकीत झालेल्या खडाजंगीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. शहर पोलिसांना माहिती मिळताच आशुतोषला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री होते बुलढाण्यात

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी बुलढाण्यात हेलिकॉप्टरने आले होते. साडेतीन तास उशिरा आल्याने व पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बुलढण्यातील त्यांचा मुक्काम वाढला होता. त्यांनी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये व्यापारी, वकील, डॉक्टर यांच्याशी संवाद साधला. अन्य काही बैठका घेतल्या. हत्येच्या घटनेच्या पूर्वीच ते रात्री उशिरा कारने संभाजीनगरकडे रवाना झाले. यामुळे पोलिसांवर त्यांच्या सुरक्षेचा आणि जयंती बंदोबस्ताचा दुहेरी ताण होता. यावर कळस म्हणजे मिरवणुकीला रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती.