बुलढाणा : मोताळा तालुक्यातील पान्हेराखेडी गावात दुर्दैवी जीव गमविणाऱ्या तमाशा फडातील मृत कामगारांच्या नातेवाईकांचा संतप्त आक्रोश आज जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाला. यामुळे परिसरात दिर्घकाळ तणाव होता. शवविच्छेदन गृहाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कान्हू सती मातेच्या यात्रेत काल बुधवारी कामगार तमाशाचे फड उभे करत असताना लोखंडी पाईप जिवंत विद्युत तारेला लागला. यामुळे तमाशा संचातील विशाल भोसले (राजूर गणपती, जि. जालना) व अंकुश वारुळे ( नारायणगाव, ता. सिन्नर जि. पुणे) हे दगावले तर राहुल जाधव ( मुंबई) हा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचार तर मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, मृतांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर एकच आकांत उसळला.

हेही वाचा : मेळघाटात आढळल्‍या ८७ फुलपाखरू प्रजाती; पाच प्रजातींची प्रथमच नोंद

हेही वाचा : “राजू शेट्टी, स्वाभिमानीशी फारकत घेतली काय?”, रविकांत तुपकर म्हणतात, “मी आजही….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तमाशा फड मालकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत पार्थिव घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले. अखेर अधिकाऱ्यांनी दीर्घकाळ समजूत घातल्यावर वारुळे परिवाराने पार्थिव ताब्यात घेतले. मात्र भोसले परिवाराने पार्थिव स्वीकारले नाही. याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात फिर्याद करण्यासाठी नातेवाईक रवाना झाल्याचे वृत्त आहे.