चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे, हे आपले भाग्य असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित आणि उत्तम भविष्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन ‘अण्णा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले.

चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा -शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टी आज भद्रावती आणि वरोरा येथे रोड शो च्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत होते. लोकसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असून भारताचे उज्वल भविष्य ठरविणारी आहे. यासाठी आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच बघायचे असल्यामुळे भद्रावतीच्या जनतेने भविष्याचा विचार करून सुधीर मुनगंटीवार यांनाच मतदान करावे असे आवाहनही सुनील शेट्टी यांनी केले.

हेही वाचा : रणसंग्राम लोकसभेचा : भाजपला उत्तरमध्ये, काँग्रेसला पूर्व नागपुरात भीती; दोन्ही उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी

या रोड शो मध्ये सुनील शेट्टी यांच्या समवेत विधानसभाप्रमुख रमेश राजूरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते, चंद्रकांत गुंडावार, अफजल भाई, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदीपे, सुनील नामोजवार, अंकुश आगलावे, प्रणिता शेंडे, लता भोयर, वंदना सिन्हा, युवराज धानोरकर, पप्पू सारवान, अर्चना आरेकर, इमरान खान, अमित गुंडावार, विशाल ठेंगणे, श्रीपाद भाकरे यांच्यासह भाजपा व महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भद्रावती येथील स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून या रोड शोला प्रारंभ झाला तर नाग मंदिरापर्यंत झालेल्या या रोड शो मध्ये सुनील शेट्टी यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांना पंचारतीने ओवाळले तर पुष्पवृष्टी देखील केली.