चंद्रपूर : तालुक्यातील नांदगावानजीकच्या गोसेखुर्द उपकालव्याच्या पुलाखालील पाईपमध्ये बिबट्याने बस्तान मांडले आहे. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही शेतकऱ्यांना सर्वप्रथम एका शेतामध्ये हा बिबट आढळून आला होता. माहिती मिळताच नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी बिबट गोसेखुर्द उपकालव्याच्या पुलाखालील पाईपमध्ये शिरला. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू केली. परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.

हेही वाचा : वर्धा : ‘उबाठा’ गटाचा संताप, बसची तोडफोड व रस्ता रोको

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोसेखुर्द कालव्याच्या पाईपमध्ये यापूर्वी बिबट आणि वाघ अडकल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दुसरीकडे, चंद्रपूर शहरात चार अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. लालपेठ कॉलरी क्रमांक २ येथील समृद्धी नगर भागात ९ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास चार अस्वल दिसून आले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही शहरात अस्वल शिरले होते.