वर्धा: एखाद्या भयपटात असावे असे वातावरण समुद्रपुर तालुक्यातील ताडगाव पंचक्रोशीत सध्या आहे. या गावाच्या एक किलोमीटर परिघात एका शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ आपली दहशत पसरवून आहे.

मात्र, बुधवारी सायंकाळपासून या वाघाने आपला मुक्काम चिमूर परिसरात हलविण्याची ताजी घडामोड आहे. चिमूर तालुक्यात पण वर्धा सीमेलगत धामणगाव येथे तो दिसून आला. दोनदा हल्ले केल्याने गावकरी जीव मुठीत घेवून जगत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… पाच हजारांवरील देयक ऑनलाईनच अदा करण्याच्या सक्तीमुळे महावितरण आर्थिक कोंडीत!..  प्रकरण काय पहा..

वन विभाग अहोरात्र गस्त घालत आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसाने या घनदाट जंगलातील पायवाटा पण निसरड्या व चालण्यास कठीण झाल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. दोनदा गाड्या चिखलात फसल्या त्या अद्याप काढणे शक्य झालेले नाही. याच परिसरात दोन बैल, एक रानडुक्कर फस्त करणारा हा वाघ केव्हा कुठे टपकेल म्हणून शेतीवर जाणे गावकऱ्यांनी सोडून दिले. तर विद्यार्थी शाळेकडे फिरकेनासे झाले. येथील जिल्हा परिषदेची शाळा जंगलास लागून आहे.

हेही वाचा… लोकजागर : ‘दारी’ येताच कशाला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षक भिंत नसल्याने सरपंच विनायक श्रीरामे यांनी लोकांशी बोलून शाळा चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. चाळीस कॅमेरा ट्रॅप लावून अहोरात्र गस्त सुरू आहे. पण पावसामुळे शोधकार्य बरेच अवघड झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी आज सकाळी बोलतांना सांगितले.