नागपूर: दिवाळी या सनामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी या काळात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहे. परंतु मागील सहा दिवसांमध्ये सोने- चांदीने विक्रमी वाढ नोंदवल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. सोमवारी (२१ ऑक्टोंबर) नागपुरातील सोने- चांदीच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशभरात सोन्याचे दर घसरले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सातत्याने सोन्याचे दरात वाढ होतांना दिसत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढत आहे. नागपुरात १५ ऑक्टोंबरला सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर सकाळी ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर सातत्याने वाढ होत आहे.

हे ही वाचा…आर्थिक फसवणुकीत ‘जामतारा’ देशात अव्वल; सर्वाधिक सायबर गुन्हेगार झारखंड-राजस्थानात

दरम्यान दिवाळीत ग्राहक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. परंतु सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनमचेही दरही १९ ऑक्टोबरला सकाळी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. दरम्यान नागपुरात २१ ऑक्टोंबरच्या तुलनेत १५ ऑक्टोंबरचे सोन्याचे दर बघता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ६०० रुपयांनी दर वाढले आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये दिवाळीत सोने- चांदीचे दागिने खरेदीबाबत संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान २१ ऑक्टोबरला (शनिवारी) दुपारी सोन्याचे दर आजपर्यंच्या इतिहासात सर्वोच्च असल्याचा दावा नागपुरातील सराफा व्यवसायिक करत आहे. दिवाळीच्या काळात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…योगेंद्र यादव यांच्या सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; धक्काबुक्की, घोषणाबाजी अन् खुर्च्यांची तोडफोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरातही मोठी वाढ

नागपुरातील सराफा बाजारात १५ ऑक्टोंबरला चांदीचे दर प्रति किलो ९० हजार २०० रुपये होते. हे दर दिवाळीच्या तोंडावर २१ ऑक्टोबरला (सोमवारी) दुपारी ९८ हजार २०० रुपये नोंदवण्यात आले. यामुळे मागील सदा दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ७ हजार ७०० रुपये प्रति किलो वाढ झालेली दिसत आहे. या दरवाढीचा परिणाम ग्राहकांकडून खरेदी होणाऱ्या चांदीच्या नाणींवर पडण्याची शक्यता आहे.