scorecardresearch

Premium

‘एमपीएससी’ : ‘महाज्योती’चे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण; कर सहायक, पीएसआय, एएसओ पदावर होणार रुजू

विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

52 students cracked sti exam, psi exam, aso exam, mahajyoti orgnization mpsc result
‘एमपीएससी’ : ‘महाज्योती’चे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण; कर सहायक, पीएसआय, एएसओ पदावर होणार रुजू (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) सहाय्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२२-२३ वर्षात घेण्यात आलेल्या कर सहायक निरीक्षक(एसटीआय), पोलिस उपनिरीक्षक(पीएसआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) पदाच्या निकालात ५२ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

हेही वाचा : जिल्हा न्यायालयांत ४६२९ पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Abducted student by giving soporific medicine kidnapped student safe by RPF vigilance
गुंगीचे औषधी देऊन विद्यार्थिनीचे अपहरण, आरपीएफच्या सतर्कतेने अपहृत विद्यार्थिनी सुखरूप
19 thousands of scholarship applications are pending in colleges
नागपूर : शिष्यवृत्तीचे १९ हजारांवर अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित
Colleges are responsible for barring ineligible students in BHMS examination
बीएचएमएस परीक्षेत अपात्र विद्यार्थ्यांना रोखण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर, आरोग्य विद्यापीठाची सूचना
New criteria for grants to colleges Draft guidelines released by UGC
महाविद्यालयांच्या अनुदानासाठी नवे निकष… यूजीसीकडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध… होणार काय?

महाज्योती ही राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत असल्याचे खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले. याचीच फलश्रृती आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एमपीएससीच्या कर सहायक पदासाठी ४७५ जांगा पैकी २१२ जागा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी होत्या. महाज्योती अंतर्गत ज्ञानदीप अकादमीचे ४३ तर युनिक अकादमीच्या ९ विद्यार्थी उत्तीर्ण होत त्यांनी यश प्राप्त केले आहे. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ५२ ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राजेश खवले यांनी दिली. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nagpur 52 students of mahajyoti cracked sti psi and aso exam mpsc dag 87 css

First published on: 04-12-2023 at 15:12 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×