नागपूर : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारखे नेतृत्व आमच्याकडे आहे. तिघांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक नंबरवर जात आहे. त्यामुळे काँग्रेससह विविध पक्षांचे नेते आता महायुतीमध्ये प्रवेश करणार असून त्यांचे स्वागत आहे, असे मत भाजपच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. महायुतीच्या मेळाव्यानिमित्त चित्रा वाघ नागपुरात आल्यास त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा : मिशन लक्ष्यवेध! ऑलिम्पिक वीर घडविणारा ‘हा’ उपक्रम कोणत्या खेळांसाठी वाचा…

Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आणि ते शिंदे गटात प्रवेश करत असतील तर महायुतीमध्ये त्यांचे स्वागत आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ. पुढेही अनेक नेते महायुतीकडे येतील. म्हणून बरीच लोक आमच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नार्वेकरांनी वस्तुस्थितीप्रमाणे, हातात असलेल्या कागदपत्रांप्रमाणे निर्णय दिला आहे. आपण आधीपासून पाहतो की उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून रडीचा डाव खेळत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयसुद्धा सोडलेले नाही. त्यांच्या बाजूने निकाल लागला तर सर्व चांगले आणि विरोधात निकाल गेला तर ते त्यांच्याकडील असलेले असेच ठेवणीचे शब्द वापरत असतात, अशी टीका त्यांनी केली. २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी काँग्रेसने नकार दिला असेल तर त्यांना प्रभू रामचंद्र सद्बुद्धी देवो अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.