नागपूर : पंढरपूरच्या सभेत पडळकरांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली. नाव न घेता ते जरांगेंना अर्धवटराव म्हणाले. ते म्हणाले, “झपाटलेला पिक्चरमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हातात एक अर्धवटराव नावाचा एक बाहुला असतो. त्याची तार खेचली तसा तो बोलतो. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक अर्धवटराव तयार झालेत.”
हेही वाचा : “गावबंदी संविधानाची पायमल्ली, भीमसैनिकांनी सोबत लढावं”, पडळकरांचं आवाहन
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तसेच पुढे ते म्हणाले, “धनगर, वंजारी एनटी आहेत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. भुजबळांच्या नादी लागून हे समाज उगाच आक्रमक होत आहेत. हे दोन्ही समाज स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्रीय नोकरी शिक्षणातलं ओबीसीतून आरक्षण भोगतात”, अशी भूमिका मांडली. आता जरांगे यावर काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे!