नागपूर : नागपूरात हिवाळी अधिवेशन आहे, नर्सरीची शाळा नव्हे. त्यामुळे नर्सरीच्या पोरांबद्दल मला प्रश्न विचारू नका, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंना टोला लगावला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांनी आदित्य ठाकरेंच्या १४ दिवसांच्या कामावर प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, “संजय राऊत आज इव्हीएम आणि व्हीपॅटवर आक्षेप घेत आहेत. तुमचा नेता साधा ग्रामपंचायत इलेक्शन देखील निवडून येऊ शकत नाही. शिवसेनेचे जेव्हा १८ खासदार निवडून आले तेव्हा इव्हिएममध्ये दोष नव्हता का? आता मोदींचा हात डोक्यावरून निघताच एकही खासदार निवडून येणार नाही, याची धास्ती त्यांना बसली आहे. त्यामुळे इव्हिएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.”

हेही वाचा : विधानभवनात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

त्याच बरोबर खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार असावेत, यासाठी आम आदमी पार्टी आणि ममता बॅनर्जींनी समर्थन दिले. पण उद्धव ठाकरे असे समर्थन न देताच महाराष्ट्रात परतले. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे डोहाळे तर लागले नाहीत ना? असा टोलाही राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.