नागपूर : “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पाळत ठेवली आहे. तर काहींना ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे-भोसले यांना कळंब पोलिसांनी स्थानबद्ध केले. पोलिसांच्या या कारवाई विरोधात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे यांना कळंब पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारच्या या दडपशाही धोरणावर वडेट्टीवार यांनी टीका केली.

हेही वाचा : तिघांचा खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा मिळणार? उच्च न्यायालयात मंगळवारी निर्णय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसत्ताशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, शासन आपल्या दारी नव्हे तर सरकारने मृत्यू आपल्या दारी असे धोरण राबवले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. त्यामुळे आत्महत्या होत आहेत. आरक्षणाचा प्रश्न हाताळता येत नसल्याने संपूर्ण राज्य धगधगत आहे. मंत्रालयाच्या कामाची वेळ संपूनही लोकांच्या रांगा लागत आहेत. मुळात हे सरकार काम कैल्याचा देखावा करीत आहे. केवळ जाहिरात करते. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. लोक त्यांना जाब विचारत आहे. त्यांना उत्तर देत येत नाही, सरकार धास्तावले आहे. त्यामुळे हे घाबरट सरकार कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.