नागपूर : ऑनलाईन विक्री, मोठे मॉल, त्यातील मोठ्या कंपन्यांची विक्री दालने, अनेक ऑफर्स, सुट, सवलतींच्या लयलूटीतही यंदा ठोक व्यापाऱ्यांसह किरकोळ आणि पदपथावर वस्तू विक्री करणाऱ्या फुटकळ विक्रेत्यांची दिवाळी जोरात झाली. कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी या मागची कारणे सांगितली आहेत.

हेही वाचा : फुटबॉल खेळताना मुलांमध्ये वाद, ठोसा मारताच एकाचा जागीच मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडे बड्या कंपन्यांच्या वस्तूची विक्री ऑनलाईन होते. त्यामुळे ग्राहक बाजारपेठेत जात नाही, त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठांवर व पर्यायाने विक्रेत्यांवर झाला होता. सणासुदीला व्यावसायिक उलाढाल होत असली तरी छोट्या विक्रेत्यांचा फायदा होत नव्हता. यंदा मात्र दिवाळीत बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावरून ग्राहक पुन्हा बाजाराकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले. किरकोळ वस्तू विक्री क्षेत्रातील सर्वच दुकानात गर्दी होती. हात गाडीवर कपडे विकणारा विक्रेता असो की फुटपाथवर बसून फळे विकणारा असो सर्वांनी चांगला व्यवसाय केला. याचे कारण म्हणजे देशी व स्थानिक बाजाराचे महत्त्व ग्राहकांना पटले, असे भारतिया म्हणाले.