नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लिनिअर एक्सिलेटर यंत्र मंजूर असून तातडीने ते घेण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानंतरही विविध तांत्रिक कारणाने हे यंत्र खरेदी झाले नाहीत. त्यामुळे येथील कर्करुग्णांचे हाल होत आहे. या रुग्णांना कालबाह्य कोबाल्टवर उपचार घ्यावे लागत असून त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

देशातील मुखाचे सर्वाधिक कर्करुग्ण नागपूरसह मध्य भारतात आढळतात. त्याला तंबाखू, गुटखा, पान मसाल्याचे सेवन हेही एक कारण आहे. येथे स्तनासह इतरही कर्करुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. नागपुरात बहुप्रतिक्षित कॅन्सर इन्स्टिट्यूट १८ महिन्यात उभारण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते. सन २०१९ मध्ये मुदत संपल्यावरही ते झाले नाही. त्यानंतर न्यायालयाच्या दबावात आता या इन्स्टिट्यूटचे काम सुरू आहे. शासनाने मेडिकलच्या कर्करोग विभागाला लिनिअर एक्सिलेटरसाठी २३.२० कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी यंत्र खरेदीसाठी मेडिकलकडून हाफकीन संस्थेकडे वर्ग झाला होता.

Pune, Sassoon, politics,
पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल
There is no facility to detect the type of poison taken by the patient admitted to the government hospital
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णाने घेतलेल्या विषाचा प्रकार शोधणारी सुविधाच नाही!
after guidelines of Election Commission doctors duty for election work Allegation of Maharashtra State Medical Teachers Association
डॉक्टरांनाही निवडणुकीच्या कामात जुंपले… अखेर वैद्यकीय शिक्षक संघटनांनी…
9 new department, cama hospital, start, benefits, patients, thane, new mumbai, raigad,
कामा रुग्णालयामध्ये सुरू होणार नऊ नवे विभाग; मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार

हेही वाचा…अद्भभूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?

परंतु, हाफकीनला यंत्र खरेदी करता आली नसल्याने हा निधी सरकारला परत करण्याची पाळी सरकारवर आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने तातीडीने हा निधी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुन्हा निविदा प्रक्रिया झाली. यावेळी मेडिकलकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संबंधित समितीकडे यंत्रात आवश्यक सोयीबाबतचे सादरीकरणही झाले. त्यानंतर दोन कंपन्यांनी यंत्र देण्याबाबत रस दाखवला. परंतु, त्यानंतर तांत्रिक कारणाने अद्यापही पुढील प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे पुन्हा हे यंत्र कधी मिळणार? ही विचारणा करण्याची पाळी मेडिकलच्या कर्करुग्णांवर आली आहे.

हेही वाचा…नागपूर: ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार

आजच्या स्थितीत जगभरात कर्करुग्णांवर आधुनिक लिनिअर एक्सिलेटरवर उपचार होत असले तरी नागपुरातील मेडिकलमध्ये हे यंत्र नसल्याने येथील रुग्णांवर कालबाह्य कोबाल्ट यंत्रावर उपचार दिले जात आहे. मेडिकलमध्ये सध्या दिवसाला ६० ते ७० रुग्णांवर कोबाल्टवर लाईट देऊन उपचार होतात, हे विशेष. या वृत्ताला मेडिकल प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.