नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज १ मे महाराष्ट्र दिनाचा निषेध करीत काळा दिवस पाळला व व्हेरायटी चौक, गांधी पुतळा येथे युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी विदर्भाचा झेंडा फडकवीला. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे कपडे, डोक्याला व बाजूला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविण्यात आला व नारे निर्देशन करण्यात आले. यावेळी “महाराष्ट्र दिनाचा निषेध असो”, “महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद”, “वेगळा विदर्भ झालाच पाहिजे “, “लेके रहेंगे – लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे”, “जय विदर्भ”, असे गगनभेदी नारे देत आंदोलनकर्ते संविधान चौक येथे जाण्यासाठी आक्रमक झाले व संविधान चौक च्या मार्गाने धावले असता पोलिसांद्वारे आंदोलनकर्त्यांना झिरो माईल मार्गांवर डिटेन करण्यात आले व सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात राहून विदर्भाचा बॅकलॉग भरून निघूच शकत नाही कारण महाराष्ट्र राज्यावर ८ लाख १४ हजार कोटी रुपयाचे कर्जाचे डोंगर आहे मग अश्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकणार नाही, बेरोजगारांना नौकऱ्या मिळूच शकणार नाही, मग अश्या दिवाळखोर राज्यात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही म्हणून केंद्र सरकार ने त्वरित विदर्भाचे राज्य तात्काळ निर्माण करावे असे मत विराआस युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी मांडले.
काळा दिवस पाळून झेंडा फडकविण्याच्या आंदोलनात जेष्ठ विदर्भवादी नेते अहमद कादर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर महिला अध्यक्षा ज्योती खांडेकर, बाबा शेळके, गुलाबराव धांडे, भरत बविस्टाले, प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन, राहुल बनसोड, हरिभाऊ पानबुडे, अमूल साकुरे, गणेश शर्मा, अण्णाजी राजेधर, जया चतुरकर, ममता मासुरकर, चंद्रशेखर पूरी, तारेश दुरुगकर, रामेश्वर मोहबे, परसराम राऊत, प्रवीण जैन, मधुकर बालपांडे, आशा पाटील, भारत मासुरकर, विजय राऊत सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.