नागपूर : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ पदे भरती करीता दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा १ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले असून आयबीपीएस कडून दिनांक २२ एप्रिल ते १६ मे २०२५ दरम्यान ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.

आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक १ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र/ हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएस कडून पाठविण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा इतरांकडून तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.