नागपूर : नागपूरसह राज्यभरात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी मोठ्या संख्येने महाप्रसाद-भोजनदान कार्यक्रम घेतले जातात. हे कार्यक्रम घेणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे, ते न करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

उपराजधानीतील विविध भागात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मोठ्या संख्येने महाप्रसादाचे आयोजन केले जात असून त्याचा आस्वाद हजारो भाविक घेतात. तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तही नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भाविकांसाठी भोजनदानाचे स्टॉल लावण्यात येतात. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार प्रत्येक भोजनदानाच्या स्टॉलधारकास नोंदणी करुन प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. हे नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरीता एफडीएने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.

हेही वाचा : काँग्रेसचं प्रेमाचं दुकान बंद पडणार; उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आरक्षण देताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अर्जामध्ये काइंड ऑफ बिझनेस फुड व्हेंडिंग इस्टॅब्लिशमेंट हे सिलेक्ट करावे. अर्जासोबत शुल्क १०० रुपये प्रतिवर्षे शुल्क व आधारकार्ड व फोटो अपलोड करणे आव‌श्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र संबंधिताच्या ईमेल आयडीवर त्वरीत उपलब्ध होते. ज्यांनी यापूर्वी नोंदणी प्रमाणपत्र घेतले आहे व त्याची मुदत संपली नसल्यास त्यांनी पुन्हा अर्ज सादर करावयाची आवश्यकता नसल्याचेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.