नागपूर: शिवसेनेच्या शिंदे गटाचे कोकणातील नेते व मंत्री उदय सामंत यांनी पक्षाच्या वाट्याला आलेल्या विदर्भातील रामटेक, यवतमाळ-वाशीम आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रचाराच्या निमित्ताने ते वेळोवेळी नागपूरसह विदर्भाच्या विविध भागात जातात. त्यांनी शिंदे गट विदर्भातील लोकसभेच्या तीनही जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मंगळवारी ते नागपूरला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, विदर्भात शिंदे गट लोकसभेच्या तीनही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकेल. भावना गवळी नाराज नाही, त्यां पक्षाच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत. सामंत म्हणाले , महायुतीत नाराजी नाही. महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सक्षम हैं. पक्ष फोडणे, ब्लैकमेल करणे हे आमचे काम नव्हे. उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचे काम करीत आहे, मुख्यमंत्री शिंदे के नेतृत्व में शिवसेना पूर्ण क्षमतेने प्रचारात उतरली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Narayan Rane
भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट! शिंदेंच्या शिवसेनेची इथेही माघार

हेही वाचा : “…तर सांगलीसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

पूर्व विदर्भात रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत यवतमाळ-वाशीम आणि बुलढाणा या शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात निवडणूक आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार उद्या संपणार आहे. रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा आहेत. शिंदे गटाने अभिनेता गोविंदालाही या मतदारसंघात आणले होते. येथे शिंदे गटाचे राजू पारवे व काँग्रेसचे शामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत आहेत. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांची उमेदवारी बाद झाली. मात्र या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मात्र निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्याने त्यांना निवडणूक लढता आली नाही. सरकारच्या दबावात बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.