नागपूर : वडिलांपाठोपाठ मुलानेही जगाचा निरोप घेतला असताना त्या कुटुंबियांच्या मन:स्थितीचाही विचार करवत नाही. मात्र, पर्यावरणासाठी वाहून घेणारे कुटुंब असेल तर या दु:खातही ते आधी त्याचाच विचार करतात. असाच एक आदर्श महादूला कोराडी येथील तिरपुडे कुटुंबियांनी घालून दिला. येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चेतनदास तिरपुडे यांचा काही दिवसापूर्वी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. पाठोपाठ त्यांचा मुलगा मुकेश तिरपुडे यांचेही अकाली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, याही स्थितीत त्यांनी कुठलेही धार्मिक कर्मकांड केले नाही.

हेही वाचा : बडनेरा ते वर्धा मार्गावर ३० रेल्‍वेगाड्या धावताहेत ताशी १३० किमी वेगाने

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?

याउलट रक्षा विसर्जन नदीच्या पात्रात प्रवाहित न करता राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पिता – पुत्राच्या स्मृतिपित्यर्थ दोन बहुवर्षीय वृक्षाची लागवड करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. या वृक्षांच्या भोवतालच्या मातीमध्ये रक्षाविसर्जन केले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांनी तिरपुडे परिवाराने पर्यावरण पूरक रक्षा विसर्जन करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याची भावना व्यक्त केली.