नागपूर : विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप एका महिला कर्मचाऱ्याने केला आहे. त्यामुळे सोमवार ११ सप्टेंबरला महिला कर्मचारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. त्यांनी विभाग नियंत्रकांवर गंभीर आरोप केले.

हेही वाचा : राज्यातील सर्वांत मोठ्या कावड महोत्सवाचा जाणून घ्या इतिहास, महत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्याने विभागीय नियंत्रक यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता महिला अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. या उपोषणाला महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. बरगे यांनी नागपुरात संघटनेचे विविध प्रतिनिधी, महिला संघटना आणि महिला आयोगाच्या सदस्यांशी बोलून याबाबत लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केल्याचे बरगे यांनी सांगितले.