नागपूर : मराठी लोकांचा संरक्षण आम्ही करतोच, पण बाहेरच्या लोकांना टार्गेट करणे योग्य नाही, असे बावनकुळे नागपूर मध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. सकाळी मुंबईला जाण्यापूर्वी त्यानी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, परप्रांतीय माणसांना मारहाण ठीक नाही. ते महाराष्ट्रात कितीतरी वर्षापासून राहतात, ज्यांचा जन्म येथे झाला आहे. त्यांना टार्गेट करणे योग्य नाही. ते पाकिस्तानचे आहे का? सरकारने कारवाई करायला पाहिजे, मी याबाबत बोलणार आहे. मराठी लोकांचा संरक्षण आम्ही करतोच, पण बाहेरच्या लोकांना टार्गेट करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले आमचे जे लोक इतर प्रदेशात राहतात त्यांच्यासोबतही उद्या असच होऊ शकते, देशात अशी अराजकता पसरवणे ही मानसिकता ठीक नाही

उध्दव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा केला. आता काँग्रेसने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचे. पण मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव उद्धव ठाकरेंसोबत आघाडी केल्याने झाला आहे ठाकरेंचा जो नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगावर आला, असे बावनकुळे म्हणाले. तेव्हा मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधानभवनात येत नव्हते, त्यामुळे ठाकरे सरकारची अँटी इन्कमबन्सीचा काँग्रेसला फटका बसला, असे बावनकुळे म्हणाले