नागपूर : एका युवकाला व्हॉट्सअॅपवर आलेल्या लिंकमधून क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीची माहिती मिळाली. त्याने कोणतीही शहानिशा न करता गुंतवणूक केली. काही दिवस दर दिवसाला ५ ते १० हजार रुपयांची कमाई दिसत असल्यामुळे युवकाने तब्बल २३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर १५ दिवसांतच सर्व रक्कम सायबर गुन्हेगाराने आपल्या खात्यात वळते करून फसवणूक केली.

गेल्या सहा महिन्यांपासून क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावावर सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या अनेकांना लाखोंमध्ये गंडा घालत आहेत. सुरुवातीला गुंतवणुकीच्या रकमेवर चांगला परतावा देऊन सायबर गुन्हेगार गुंतवणुकदारांना जाळ्यात ओढतात. त्यांचा विश्वास बसला की त्यांना मोठी रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. दर दिवसाला ५ ते १० हजार रुपयांची कमाई होत असल्याने अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.

हेही वाचा : शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती

मोठी रक्कम गुंतवल्यानंतर चक्क पैसे परस्पर वळते करून फसणूक करतात. नागपुरातील सिम्बॉयसीस कॉलेज येथे राहणारे सौरभकुमार शर्मा (बैसाखी-पश्चिम बंगाल) यांना एक लिंक मिळाली. त्यामध्ये क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळण्याचे आमिष होते. सौरभकुमार यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १ लाख रुपये गुंतवले. त्यांना १० दिवसांत दोन लाख रुपयांची कमाई झाली. त्यामुळे सौरभकुमारने खात्यातील २३ लाखांची रक्कम गुंतवली. काही दिवस १० हजार रुपये कमाई व्हायला लागली.

हेही वाचा : लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व सुरळित असतानाच एक दिवस अचानक सौरभकुमार यांचे खाते बंद झाले आणि गुंतवलेली रक्कम हडपल्या गेली. प्रकार लक्षात येताच त्यांनी वाठोडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्ह्याची एक एक कळी उलगडने सुरु केले आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे युवकाने वरिष्ठांकडे जाण्याची तयारी केल्यामुळे अखेर वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.